नागपूर ग्रामीण: हिट अँड रन : सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत मित्राच्या डोळ्यासमोरच तरुणीचा मृत्यू
पारडी परिसरात सिमेंट मिक्सर ट्रकच्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २८ जून रोजी सकाळी १०:४० ते ११:०० च्या दरम्यान ही घटना घडली. विवेक गुलाबचंद गुप्ता (वय २७) हे त्यांची मैत्रिणी इंद्रायणी देवेंद्र वैरागडे, वय २५ वर्ष यांच्यासोबत दुचाकीवरून भंडारा रोडवरून जात असताना, एका सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.