जालना: सत्ता हातात, महापालिका ताब्यात; तरीही भाजप नगरसेवक भास्कर दानवे यांचे आयुक्तांना निवेदन
Jalna, Jalna | May 7, 2026 महानगरपालिकेत सत्ता असतानाही भाजपचे महानगराध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे यांना विविध मागण्यांसाठी आयुक्त अंजली शर्मा यांना निवेदन देण्याची वेळ आल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष म्हणून महानगरपालिकेची जबाबदारी भाजपकडे असताना दुसरीकडे मूलभूत प्रश्नांसाठीच निवेदन देण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी जालना शहरातील हद्दवाढ भागातील विविध प्रश्नांबाबत महानगरपालिका आयुक्त अं