नाशिक: पोलीस आयुक्त कार्यालयात शिक्षणमंत्री ना. दादाजी भूसे यांचे उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था संदर्भात बैठक पडली पार
Nashik, Nashik | Sep 29, 2025 नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी पोलीस आयुक्तालयात शिक्षणमंत्री ना. दादा भूसे यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली.बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले – शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले. रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश, वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय, अल्पवयीन गुन्हेगारी अशा प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.