पाचोरा: माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नीचे दिवाळीनिमित्त शुभेच्छांचे आशीर्वाद ड्रीम सिटी येथील बॅनर अज्ञातांनी फाडले,
दिनांक १७ ऑक्टोबर 2025 रोजीच्या मध्यरात्री सौ. सुचिता ताई दिलीप भाऊ वाघ यांचे दिवाळीनिमित्त शुभेच्छांचे पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथील बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो ह्या निवडणुका पूर्ण पणे व्यवस्थित पार पाडणे ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच आपली सुद्धा आहे बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा पडतही नसतं. अश्या प्रकारामुळे शहरातील प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.