गेवराई: महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी हिरापूर शिवारात राष्ट्रीय समाज पक्षाने पाण्यात उतरून जल आंदोलन केले
Georai, Beed | Sep 24, 2025 गेवराई तालुक्यातील हिरापूर परिसरामध्ये शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी थेट शेतात उतरून जल आंदोलन छेडले आहे. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे उभे पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी शेतामध्ये उतरले व घोषणाबाजी केली. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी