नागपूर शहर: प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या आरोपीला अटक ; राकेश पान पॅलेस येथे वाठोडा पोलिसांचा छापा
29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन थंडर अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आठवडा पोलिसांनी उमरेड रोडवर असलेल्या राकेश पान पॅलेस येथे छापा मार कार्यवाही करून आरोपी तुकाराम कुंभरे याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गुटखा व इतर साहित्य तसेच खरा गुटण्याची मशीन असा एकूण 21,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे