पालघर: काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे बळवंत गावीत व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थिती हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.