उत्तर सोलापूर: बंजारा समाजाच्या १६ सप्टेंबरच्या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा: शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांची माहिती...
बंजारा समाजाने हैद्राबाद गॅजेट प्रमाणे एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सोमवारी दुपारी 1 वाजता पत्रकारांशी बोलताना पूर्ण पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले की, बंजारा समाजाच्या न्याय्य मागण्या प्रामाणिकपणे ऐकल्या जाण्याची गरज आहे आणि प्रशासनाने समाजाच्या समस्या गंभीरपणे विचारात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा.