वरोरा: वरोरा येथील टोल नाका येणाऱ्या 15 दिवसात बंद करा मनसेचा टोल कंपनी ला अल्टीमेटम
मागील अनेक वर्षांपासून वरोरा येथील उडानपूल बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या टोल कंपनी कडून टोल वसुली सुरु असताना कंपनी कडून रस्त्यावर असुविधा आहे .मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात येणाऱ्या हजारो जडवाहन धारकांकडून टोल वसुली जोरात सुरु आहे, त्यामुळे हा कपंनीचा टोल नाका येत्या 15 दिवसात बंद करावा अन्यथा हा टोल नाका फोडला जाईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी आज दि 20 सप्टेंबर ला 12 वाजता निवेदनातून दिला आहे .