अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 20 नोव्हेंबरला दुपारी 05 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माणाधीन साइटवर जळलेल्या अवस्थेत एका मजुराजा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास पोलीस करणार आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे