जालना: जालना शहरातील मंगळबाजारातून गोवंशीय मांसासह रिक्षा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालना शहरातील मंगळबाजार परिसरात गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास गुरुगोविंद नानक गुरुद्वारासमोर मंगळबाजार येथे ही कारवाई करण्यात आली. संशयीत आरोपी हमीद हफीज खान रिक्षाचालक, रा. मंगळबाजार आणि अब्दुल कुरेशी जाफर कुरेशी रा. कन्हैयानगर यांना ताब्यात घेतलं.