जालना: माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत पत्रकारांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्याचे आश्वासन
Jalna, Jalna | Oct 11, 2025 जालना येथील महावितरणच्या कर्मचार्यांनी दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मागील दोन दिवसापासून पत्रकार आमिर खान आणि सुनील भारती उपोषणाला बसले होते. मात्र, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आमेर खान यांनी दिली. जालना येथील पत्रकार सुनील भारती यांना महावितरण कर्मचार्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती.