नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रचार, प्रसिध्दीकरीता राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून विविध माध्यमांचा वापर करण्यात येईल. यामध्ये आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे व मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार, प्रसार व्हावा या करिता आयोगाच्या दि. 09 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणूकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहीरात प्रमाणन आदेश 2025’ या अधिसूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने सदर अधिसूचनेनुसार महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे.