तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे आज दिनांक १९ जानेवारी रोज सोमवारला दुपारी ३ वाजता ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. सरपंच चंदा कंठीलाल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात गावातील महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी उपस्थित महिलांना तिळगुळ वाटप करून आणि वाण देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.