अकोला : येत्या ५ नोव्हेंबरला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असून तो नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा व ३० टक्के अधिक प्रकाशमान दिसेल. सुमारे नऊ वर्षांनंतर असा “सुपर डूपर मून” पाहण्याची संधी मिळणार आहे. या आठवड्यात चंद्र विविध नक्षत्रांत भ्रमण करणार असून ५ नोव्हेंबरला वृषभ राशीत उल्का वर्षावही होईल. दरम्यान, बुध, शनी, गुरु, शुक्र आणि मंगळ हे पाचही ग्रह दर्शनास उपलब्ध असून आकाशप्रेमींसाठी हा आठवडा विशेष ठरणार आहे.अशी माहिती अकोल्यातील खागोलशास्त्री प्रभाकर दोड यांनी दिनांक 1नोव्हेंबर रोजी सायं