बीड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी उद्या, रविवार दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी काही संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता, पोलीस अधीक्षक