अकोला: लग्नासाठी मुलगी मिळून द्या मी जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाही अकोल्यातील तरुणाचं थेट शरद पवार यांना पत्र.
Akola, Akola | Nov 13, 2025 ग्रामीण भागातील अनेक लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, त्यांची वये निघून चालली आहेत, ही गंभीर सामाजिक समस्या बहुतेकांना चांगलीच माहीत आहे. तथापि, स्थानिक पातळीवर ही समस्या सुटण्याची आशा संपल्याने असे तरुण आता थेट देशपातळीवरील नेत्यांना साकडे घालू लागले आहेत. अकोल्यातील एका तरुणाने ८ नोव्हेंबर रोजी चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही! अस या पत्रात म्हटलं.