दिग्रस: शहरातील कमान गेट परिसरात जुन्या वादातून एकावर हल्ला, तिघांविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
दिग्रस शहरातील कमान गेट जवळ जुन्या वादाच्या कारणातून एकावर लोखंडी अँगलने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान संजय सुदाम जाधव, सुदेश सुदाम जाधव आणि आनंद सुदाम जाधव (सर्व रा. कमान गेट जवळ, दिग्रस) यांनी संगनमत करून फिर्यादी राजेश हरीबल्भजी भट (रा. दुर्गामाता चौक, दिग्रस) यांच्याशी जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ केली तसेच लोखंडी अँगलने मारहाण केली.