सातारा: पाहुण्यांचा पाहुणचार केला नाही म्हणून विवाहितेला मारहाण, पतीसह चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 21, 2025 मार्च 2024 पासून ते दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत, पतीसह चौघांनी पुण्यातील राहत्या घरात, घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच घरामधील कामे न केले, पाहुण्यांचा पाहुणचार केला नाही अशा कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी केसरकर पेठ येथील राहणाऱ्या विवाहित महिलेने, पती, सासू व इतर दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता फिर्याद दिली, या फिर्यादीनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर जाचहाट सह दुखापतचा गुन्हा दाखल केला आहे.