चांदूर बाजार: शिरजगाव बंड येथे एसटी बसची बैलबंडीला धडक लागून बैल बंडी चे नुकसान. चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील शिरजगाव बंड येथे, दिनांक 15 सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता चे दरम्यान एसटी बसची बैलबंडीला धडक लागून नुकसान झाले असल्याची तक्रार अजय विनायकराव राऊत राहणार शिरसगाव बंड यांनी 19 सप्टेंबरला रात्री आठ वाजून 32 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे