दि.21 डिसेंबर 2025 रोजी "हिंद की चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम खारघर या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची पूर्वतयारी बैठक आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पनवेल परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, पोलीस विशेष शाखा उपायुक्त रश्मी नांदेडकर उपस्थित आहेत.