सातारा: स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार, जिल्हाध्यक्ष डॉ.रमाकांत साठे, उमेश चव्हाण
Satara, Satara | Oct 21, 2025 आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी त्या अनुषंगाने संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. रमाकांत साठे यांनी आज सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता केले.रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार कामास आरंभ करण्यात आला आहे.