जालना: सिंधी काळेगावात अवकाळी पावसाचा फटका; वीज कोसळून तीन जनावरे दगावली, आमदार खोतकरांची तात्काळ पाहणी
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.दरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर यांनी घटनास्थळी धाव घेत बांधावर जावून पाहणी केली. शेतकरी सदाशिवराव मुळे यांच्या शेतात अचानक वीज कोसळली.या घटनेत त्यांच्या तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला.