चांदूर रेल्वे: वाढोणा येथे वृद्ध महिलेला शिवीगाळ करून केली मारहाण ;तीन जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
65 वर्षीय वृद्ध महिलेने तीन जनाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे .सदर फिर्यादी महिलेचा मुलगा व राजकुमार मंगल राठोड यांच्यात बाचाबाची सुरू होती .महिलेचा पती याने राजकुमारला हटकले तर राजकुमार व फिर्यादी महिलेच्या मधात वाद सुरू झाला. वाद सोडविण्याकरता फिर्यादी महिला गेली असता छत्तीस वर्षीय महिलेने फिर्यादी महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली .राजकुमार याने फिर्यादी महिलेच्या पतीला काठीने मारले तसेच नमन राठोड शिवीगाळ केले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे .