जालना: नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; कठोर कारवाईची जालन्यातून मागणी
Jalna, Jalna | May 19, 2026 देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याची तीव्र भावना व्यक्त होत असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जालन्यातून करण्यात आली आहे. मंगळवार दि. 19 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वजाता मिळालेल्या माहितीनुसार 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप होत असून यामुळे तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.