पुणे–बंगळूरू आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू असून कराड शहरालगत उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कामाची गती अत्यंत मंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे जागोजागी खोदकाम करण्यात आले असून महामार्गालगत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला.