हनुमान नगर परिसरातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता अज्ञात आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
आज रविवार 14 सप्टेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एका फिर्यादीने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा अल्पवयीन मुलगा घराच्या बाहेर गेला तो पुन्हा घरी परत आला नाही त्याला आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून आला नाही, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी पळून नेले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहे.