सातारा: हॅपी दिवाळी" उपक्रमाअंतर्गत दिव्यांग व दृष्टीहीन बांधवांना फराळ वाटप
Satara, Satara | Oct 22, 2025 "उमेद" या मानसिक आरोग्य व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने "हॅपी दिवाळी – हेल्प फॉर ब्लाइंड" या उपक्रमांतर्गत दिव्यांग आणि दृष्टीहीन बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सातारा येथील शिंदे सावकार हॉटेलच्या हॉलमध्ये आज बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे न्यायाधीश देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केले.