कोरेगाव: साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; दोन साखर कारखान्यांनी परवानगीशिवाय सुरू केला गळीत हंगाम, शेतकरी संघटना आक्रमक
गळीत हंगाम सुरू करताना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील दोन खाजगी साखर कारखान्यांनी परवाना न घेताच गाळप सुरू केले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन देखील साखर आयुक्त कोणतीही कारवाई करत नाहीत. कोरेगाव तालुक्यातून राजरोसपणे ऊस पळवला जात आहे, शेतकऱ्यांना आमिष दाखवले जात आहे. याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आणि सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे.