महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार आज विविध पथकांना त्यांच्या जबाबदाऱ्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये व्हिडिओ व्ह्यूइंग पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक तसेच भरारी पथक यांना प्रशिक्षण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अतिरीक्त आयुक्त महेश मेघमाळे व उपायुक्त रवीकिरण घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. तसेच इव्हीएम हाताळणी प्रशिक्षण महापालिकेच्या व्यापारी संकुल येथे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.