जालना: चंदनझिरा पोलिसांची वेगवान कारवाई; खून प्रकरणातील दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात
Jalna, Jalna | May 9, 2026 जालना शहरातील चंदनझिरा भागातील एकता चौक परिसरात झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत चंदनझिरा पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून दोन धारदार खंजीर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसर्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. दि. 7 मे 2026 रोजी रात्री एकता चौक परिसरात जितेंद्र रवि आडसुळ रा. बदनापूर, जि. जालना यांची अज्ञात तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली होती.