अकोला: ४ डिसेंबरला पुन्हा एकदा ‘सुपरमून’; नुसत्या डोळ्यांनी दिसणार अद्भुत दृश्य, खगोलशास्त्री प्रभाकर दोड
Akola, Akola | Nov 29, 2025 अकोला : येत्या ४ डिसेंबर रोजी आकाशात पुन्हा एकदा सुपरमूनचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळणार आहे. पृथ्वीपासून अवघ्या ३,५७,२०६ किमी अंतरावर येणारा चंद्र आकाराने मोठा व अधिक तेजस्वी दिसेल. त्याच दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रात तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनही रात्री ७.११ ते ७.१६ दरम्यान पश्चिमेकडून दक्षिणेकडे प्रवास करताना दिसणार आहे. हिवाळी थंडीत हा दुर्मीळ आकाश सोहळा नागरिकांनी नक्की अनुभवावा, असे आवाहन विश्व भारती विज्ञान केंद्राचे खगोलशास्त्री प्रभाकर दोड यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी