आष्टी: तालुक्यात पेठ पांगरा येथे तलाव फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्यात जाऊन नुकसान झाले
Ashti, Beed | Sep 17, 2025 आष्टी तालुक्यातील पेठ पांगरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. गावातील तलाव फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अचानक तलाव फुटल्याने पाणी वेगाने शेतात शिरले आणि कापूस, सोयाबीन, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे गणित बिघडले असून त्यांच्या कष्टाचे पाणी पाण्यात गेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकांसाठी घेतलेले कर्ज, खत, बियाण्यांवर केलेला खर्च आता वाया गेला आहे.