जालना: नंदूरबारचे श्रीकांत कनवारिया जालन्याला तर मिन्नू पी.एम. संभाजीनगरला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
Jalna, Jalna | Apr 2, 2026 राज्य शासनाने प्रशासनिक स्तरावर महत्त्वाचे बदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. गुरुवार दि. 2 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या फेरबदलात नंदुरबार, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये प्रमुख पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शहादा उपविभाग, नंदुरबार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर करण्यात आली आहे.