औंढा नागनाथ: ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांचे औंढा नागनाथ मंदिर कमान परिसरात भव्य स्वागत;पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ओबीसी आरक्षणाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे दिनांक १७ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजे दरम्यान मोठ्या बंदोबस्तात कळमनुरी कडे जात असताना औंढा नागनाथ शहरातील श्री नागनाथ मंदिर कमान परिसरात त्यांचे फटाक्याच्या अतिशबाजीत जेसीबी च्या साह्याने फुलाची उधळण करून सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर हाके, वाघमारे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन श्री आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेतले.