चांदूर बाजार: मासोद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याने वाहन चालकाविरुद्ध चांदूरबाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
आज दिनांक बारा नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील मासोद फाट्यावर झालेल्या अपघातात दीपक सरदार नावाच्या इसमाचा उपचारादरम्यान नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला असल्याने, दिनांक 11 नोव्हेंबरला तीन वाजून पंधरा मिनिटांनी अरुणा दीपक सरदार या महिलेने टाटा सुमो वाहन क्रमांक एम एच 27 ए आर 43 22 या वाहनाच्या चालका विरुद्ध चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे