गेवराई: गोदावरी नदीला पूर आल्याने राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेली. परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण
Georai, Beed | Sep 23, 2025 साडेतीन पवित्र पिकांपैकी एक असलेले राक्षसभुवन शनी मंदिर आज पुन्हा एकदा पुराच्या तडाख्यात सापडले असून हे मंदिर पाण्याखाली गेले आहे. नाशिक आणि धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून जवळपास १ लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून, राक्षसभुवनसह गोदाकाठची अनेक गावे जलमय झाली आहेत. काही गावांचा तर पूर्णतः संपर्क तुटलेला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु असले तरी पुरस्थिती गंभीर आहे.