नागपूर ग्रामीण: बुटीबोरी एमआयडीसीत मशीनखाली दबून कामगाराचा मृत्यू
एमआयडीसीतील 'एसकेजी रिफ्रॅक्टरीज' कंपनीत 2 जूनला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. मशीनच्या मेंटेनन्सचे काम करत असताना लोखंडी स्पिंडल खाली दबून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.मृत कामगाराचे नाव हिरण्य कुमार मोहंती (वय ५१ असे सांगण्यात आले आहे. मोहंती इलेक्ट्रिक प्रेसिंग मशीनचे मेंटेनन्स करत असताना अचानक त्यांच्या पोटावर लोखंडी स्पिंडल पडले