धारणी: धारणी येथे कौटुंबिक वादातून महिलेवर मारहाण; जीवे मारण्याची धमकी
पती-पत्नीतील वादातून एका महिलेवर मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक धारणी पोलीस स्टेशन हद्दीत १६ ऑक्टोबर रोजी दीड वाजता घटना घडली. या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा प्रेमलाल पाटोळकर या घरी असताना त्यांचे पती प्रेमलाल ब्रिजलाल पाटोळकर हे घरात आले. त्यावेळी घरातील वादावरून आरोपी पती म्हणाला की, “घरी माझी आई व भाऊ आले असता तू त्यांना बोलली नाहीस, पाणीही दिले नाहीस....