टी.एम. नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील बांधकामाच्या ठिकाणाहून ३७ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. याबाबत बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.