महापालिका निवडणूकीसाठी बुधवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या मुलाखतींमध्ये १०६ इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये काही चांगले उमेदवार यांनी आपला निवडणूकीसंदर्भात अंजेडा मांडला. तसेच युती संदर्भात वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असून ती देखील येत्या दोन दिवसात घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शिवकॉलनी येथील पक्ष कार्यालयात माहिती दिली.