जळगाव शहरातील प्रभाग १३ मध्ये केलेल्या कामे आणि विकासाचे व्हिजन आल्याने आगामी काळात होणारी कामे लक्षात घेता, महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाली पाहिजे अशी इच्छा जनतेची आहे. अशी प्रतिक्रीया माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी रविवारी 11 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता व्यक्त केली आहे. आज महायुतीचा प्रचार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.