हिवरखेड ग्रामपंचायतचे ते नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र याच मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.. काल हिवरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली.या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवरखेड ग्रामपंचायतीचे न.प.त रूपांतर करणे, हे गेल्या 10 वर्षातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.हिवरखेड ग्रामपंचायत ही नगपरिषद आमच्यामुळे झाली असा दावा त्यांनी केला.