सेनगाव: तालुक्यात ठाकरे गटाला धक्का, पिनू पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश
सेनगांव तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला असून ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले पिनु पाटील यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच पिनू पाटील यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.