आज मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांज्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे आज 14 जानेवारी रोजी शहरातील महत्त्वाचे 15 उडान पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. आज सकाळी सहा वाजता पासून हे उडान पूल बंद करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे 12 तास हे उडानपूल बंद आहेत.