दिग्रस शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समता, मानवता आणि बंधुता या डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देत एकूण ६९ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजसेवेची अनोखी परंपरा जपली.