महाबळेश्वर: बदली होत नसल्याच्या नैराश्येतून महाबळेश्वर एस. टी. आगारात दोन कर्मचाऱ्यांचा इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगारात दोन कर्मचाऱ्यांनी सातत्याने विनंती अर्ज करून देखील बदली होत नसल्याच्या नैराश्येतून बुधवारी दुपारी दोन वाजता आगार परिसरातील इमारतीच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता सूर्यकांत मोहिते या महाबळेश्वर आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.