सातारा: बुद्धगयातील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी साताऱ्यात सतरा सप्टेंबर रोजी जन आक्रोश आंदोलन मोर्चा
Satara, Satara | Sep 14, 2025 जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान व जेथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, त्या बुद्ध गयातील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी, भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 17 सप्टेंबर रोजी, जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्यावतीने, आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता, शाहू चौक येथे प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.