भुसावळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेवटच्या दिवशी अर्ज केंद्रावर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडणे आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी इच्छुकांनी अक्षरशः झुंबड केली होती.