हातकणंगले: भुषा पॉइंटवरील तरंगता दवाखाना व बोट ॲम्ब्युलन्सची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली पाहणी, उत्तम आरोग्य सेवा
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन दिवसांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रे व रुग्णालयांची पाहणी केली. त्यांनी सरदार सरोवर जलाशय क्षेत्रातील भुषा पॉईंट येथील बोट ॲम्ब्युलन्स व तरंगत्या दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्यसेवेचा आढावा घेतला.या भागातील आरोग्य सेवा अत्यंत दुर्गम परिस्थितीतही नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचा आढावा मंत्री आबिटकर यांनी आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घेतला.